मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

Updated: Apr 15, 2015, 07:06 PM IST
मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत title=

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

यामुळे साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीत यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय घेताना मोक्का विचारात घेतला जाऊ नये असंही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या निर्देशात म्हटलंय.

प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीतसह १० जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर या १० आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. या १० आरोपींपैकी राकेश धनावडे या शस्त्रपुरवठ्याचा आरोप असणाऱ्या आरोपीला मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. 

मालेगाव स्फोटातल्या आरोपींवर लावण्यात आलेल्या मकोका चुकीचा असल्याचा निष्कर्ष विशेष मकोका न्यायालयाने मांडला होता. मात्र उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय खोडून काढताना मकोका कायम ठेवला. त्याविरोधात आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.