नवी दिल्ली : हायवेलगतचे बीअर बार परमीट रुम बंद करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. हायवे लगतच्या बीअर बार परमीट रुमना अभय देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने फटकारले. या संदर्भात राज्य सरकारची पळवाट सुप्रीम कोर्टाने फेटाळली.
राज्य सरकारने आपल्या निर्णयात बार आणि परमीट रुमना सुट दिली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टाचा निर्णयाने फार मोठा झटका बसलाय. दरम्यान वीस हजार लोकसंख्येवरील शहरात मर्यादा घटवण्यात आली आहे. पाचशे एवजी दोनशेवीस मीटरमध्ये दारु विक्री बंदी , एक एप्रिलपासून हायवे लगतची दारु दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हायवे लगतच्या बीअरबार रेस्टॉरंट आणि पबमध्येही दारु विक्रीचा बंद करण्याचा आदेश दिला आहे. पंधरा डिसेंबरअगोदरचे परवाने तीस सप्टेंबर पर्यंच वैध राहणार असल्याचा निर्वाळाही देण्यात आला आहे.