नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजारी असलेल्या किंवा लोकांना धोकादायक ठरु शकणाऱ्या कुत्र्यांची हत्या करण्याला परवानगी दिली आहे.
केरळ, मुंबई हायकोर्टाच्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयाला प्राणीमित्र संघटनांनी आवाहन दिलं होतं. ‘त्या’ कुत्र्यांना मारण्यास हायकोर्टांनी दिलेला संमतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.
या संदर्भात कुत्र्यांच्या उपाययोजनासंदर्भात सचिवांना प्रतिज्ञापत्र देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन काही जणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या प्रश्नावर सरकारने पावलं उचलावीत म्हणून अनेकदा दबाव टाकण्यात आला.
राज्यासह देशभरात विविध ठिकाणी भटक्या किंवा पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यात अनेक चिमुरड्यांना प्राण गमवावे लागले होते तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अशा कुत्र्यांमुळे कोणाला धोका पोहचत असेल, तर त्यांना मारुन टाकावं, असं मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.