चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता सध्या रुग्णालयात आहेत. त्या 'अम्मा' या नावाने देशात परिचित आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज त्यांच्या अनुपस्थित विश्वासू मंत्री बैठक करत आहेत. मात्र, त्यांची उपस्थिसाठी चक्क टेबलावर फोटो ठेवून बैठक घेतली जात आहे.
गेले तीन आठवडे जयललिता हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. तामिळनाडूच्या मंत्रालयात सध्या सर्व निर्णय जयाअम्माचा फोटो अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ठेवूनच घेतले जात आहेत. सगळे काही अम्मांच्या समोर सुरू असल्याचे समाधान मिळावे म्हणून विश्वासू आणि निष्ठावंत निर्णय घेत आहेत.
जयललिता यांच्या आदेशाशिवाय सरकारचे काम तसेच मंत्र्यांचे काम चालत नाही. मात्र, २२ सप्टेंबरपासून जयललिता हॉस्पिटलमध्ये असल्याने अण्णा द्रमुकच्या मंत्र्यांचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळेच त्यांनी एक युक्ती शोधून काढली आणि टेबलावर फोटो ठेवून निर्णय घेण्यात येत आहे.