नवी दिल्ली : बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लाम धर्माला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करायला हवे, असे नसरीन यांनी म्हटले आहे.
ढाक्यातील एका रेस्टॉरंटमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी २० परदेशी पर्यटकांना ओलिस ठेवून नंतर त्यांची शनिवारी निर्घृण हत्या केली होती.
नसरीन यांनी अनेक ट्विट करून म्हटले आहे की, 'बांगलादेशने ३६ देशांमधील दहशतवादी संघटनांना सहभागी करून घेतले आहे, असे सलीम समाद यांनी म्हटले आहे. यामुळे मानवतेसाठी इस्लाम धर्म हा शांततेचा धर्म असल्याचे बोलणे आता बंद करायला हवे.
ढाक्यातील दहशतवादी हा येथील एका प्रसिद्ध विद्यापीठात शिकला होता. इस्लामच्या धर्मावर त्याचे ब्रेनवॉश करण्यात आले आणि तो दहशतवादी बनला. ढाक्यातील सर्वच दहशतवादी ही श्रीमंत घराण्यातील आणि चांगल्या शाळेमध्ये शिकलेले होते. गरीब आणि निरक्षर नागरिकांनाच इस्लाम दहशतवादी बनवले जाते हे बोलणे बंद करा', असेही तस्लिमा नसरीन यांनी म्हटले आहे.