केजरीवालांच्या शपथ समारंभानंतर एक शिक्षक बनला चोर!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शपथग्रहण समारंभात सहभागी झाल्यानंतर एक शिक्षक चोर बनला आहे. ऐकून जरा धक्का बसला असेल, मात्र याचं कारणही काहीसं तसंच आहे. 

Updated: Apr 18, 2015, 01:28 PM IST
केजरीवालांच्या शपथ समारंभानंतर एक शिक्षक बनला चोर! title=

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शपथग्रहण समारंभात सहभागी झाल्यानंतर एक शिक्षक चोर बनला आहे. ऐकून जरा धक्का बसला असेल, मात्र याचं कारणही काहीसं तसंच आहे. 

जामियानगरचा रहिवाशी असलेल्या अकील उर्फ समीर (३१) याला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी दरम्यान माहिती मिळाली की रामलीला मैदानातील अरविंद केजरीवाला यांच्या मुख्यमंत्री शपथग्रहण कार्यक्रमात त्याचा ९ हजार रूपयांना मोबाईल चोरीला गेला होता. 

या घटनेनंतर तो स्वत: चोर बनला आणि लोकांचे पैसे आणि सोनं चोरी करू लागला. मात्र  चोरी करण्याची त्याची पद्धत जरा वेगळी होती. चोरी केलेल्या बॅगमध्ये जर महत्वाची वस्तू अथवा कागदपत्र असल्यास त्या वस्तू तो पिडीत व्यक्तीच्या घरी पोस्टाने पाठवत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डजनभर स्त्रीयांच्या बॅगा त्याने परत केल्या होत्या. 

आरोपीच्या मते कागतपत्र बनवणे खूप कठीण काम आहे. त्यामुळे तो कागदपत्र पुन्हा पोस्टाने पाठवून देत असे. ह्या चोराने  दिल्लीच्या विद्यापीठात बीकॉम आणि बीएड केले आहे. त्याला अमर कॉलनी मार्केटमध्ये एका महिलेची पर्स चोरतांना पकडण्यात आलं होतं, त्यानंतर या सर्व गोष्टींचा खुलास झाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.