www.24taas.com,नवी दिल्ली
दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आलय. यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक दिल्लीत पार पडली.
या बैठकीत राज्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा केंद्रापुढे सादर करण्यात आला. यावेळी केंद्रानं राज्याला विभागवार प्रस्ताव देण्यास सांगितलं. तर राज्यानं केंद्राकडं ३७६१ कोटींची मागणी केलीय. दोन टप्प्यात ही मदत मिळावी. अशी मागणी करण्यात आलीय. पहिल्या टप्प्यात तात्काळ उपाययोजनांसाठी २०९३ कोटी आणि दुस-या टप्प्यात १६६८कोटी मिळावेत. अशी मागणी केलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचं शिष्ठमंडळ उपस्थित होतं..तर केंद्रीय अर्थमंत्री पी चिदम्बरम आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही या बैठकीला उपस्थित होते.
राज्यातील दुष्काळी परिस्थीतीचा विचार करता प्रती हेक्टर तीन हजार रुपये मदत आणि सिंचनासाठी २२१७ कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार आहे. राज्यातल्या १२२ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर ही मदत मागण्यात आलीय. दरम्यान मुख्यमंत्री आज पंतप्रधानांची भेट घेणारेत.