चौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित, घटना सीसीटीव्हीत कैद

गुजरातच्या वलसाडमध्ये एक अशी घटना घडली, जी ऐकून आपणही चमत्कार झाला असंच म्हणाल. एक चार वर्षाची मुलगी चार मजली इमारतीच्या अखेरच्या माळ्यावरून खाली पडली आणि तरीही ती सुरक्षित वाचली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 

Updated: Jan 7, 2015, 10:19 AM IST
चौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित, घटना सीसीटीव्हीत कैद title=

वलसाड: गुजरातच्या वलसाडमध्ये एक अशी घटना घडली, जी ऐकून आपणही चमत्कार झाला असंच म्हणाल. एक चार वर्षाची मुलगी चार मजली इमारतीच्या अखेरच्या माळ्यावरून खाली पडली आणि तरीही ती सुरक्षित वाचली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 

चार वर्षाची मुलगी माही टेरेसवर आपल्या आजोबी-आजीसोबत खेळत होती. मात्र अचानक ती छतावरून पडली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं तिला उचललं.  

माहीचे कुटुंबिय या घटनेला चमत्कार मानतात, कारण एवढ्या उंचीवरून पडल्यानंतरही माहीला गंभीर जखमा झाल्या नाहीत, ही आनंदाचीच बाब आहे. माही सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि लवकरच तिला सुट्टी मिळेल.  
 
वलसाडचे डॉक्टर एम.एम.कुर्सी मुलीचं चेकअर केल्यानंतर म्हणाले, ही घटना म्हणजे चमत्कार. चमत्कारामुळेच चिमुरडी वाचली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.