www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
दिल्ली, मुंबईत झालेल्या गॅंगरेपनंतर देश हादरा. सर्वत्र आंदोलने केली केली. त्यानंतर बलात्कार कायद्यात बदलाचे वारे वाहिले. असे असताना पुन्हा पुन्हा अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्काराचे सत्र सुरुच आहे. दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांचा खून करण्यात आलाय.
उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये सख्या दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली होती. आता मुझ्झफरनगरमध्ये एक आणि कुर्थलमध्ये एका युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घून खून केल्याची घटना समोर आली आहे.
मुझ्झफरनगरमधील दुल्हेरा गावातील एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक उघड झाली आहे. शहापूर या खेड्यातून दुल्हेरा या तिच्या गावाकडे जात असताना पाच अज्ञातांनी तिच्यावर बलात्कार केला. पाच अज्ञात व्यक्तींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दुसऱ्या घटनेमध्ये कुर्थल येथे शेतामध्ये काम करत असलेल्या वडिलांसाठी जेवण घेऊन जात असलेली १५ वर्षीय युवती गेल्या तीन दिवसांपासून गायब होती. तिचा मृत देह शेतातील एका विहिरीमध्ये शुक्रवारी आढळून आला. तिच्यावर देखील सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.