नवी दिल्ली : लोकसभेमध्ये धार्मिक हिंसाचार विधेयकावर चर्चेच्या मागणीसाठी काँग्रेसनं आज गोंधळ घातला.
काँग्रेसनं चर्चेसाठी स्थगन प्रस्तावही दिलाय. राहुल गांधींनी यावेळी वेलमध्ये येत पंतप्रधानांसमोर घोषणाबाजी केली. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. सध्या देशात एकाच व्यक्तीची सत्ता आहे. कुणाचाही आवाज ऐकूनच घेतला जात नाही. संसदेतही आम्हाला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप केलाय.
धार्मिक हिंसाचार विधेयकावर चर्चेच्या मागणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राजीव गांधी लोकसभेत स्पीकर वेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. अध्यक्षांच्या खुर्चीसमोर जाऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यामुळे उडालेल्या गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं. सरकार या विधेयकावर चर्चा करू इच्छित नाही... आम्हाला सदनात बोलण्याची संधी दिली जात नाही... केवळ एकाच व्यक्तीचं ऐकलं जातं... असे आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केलेत.
यावेळी, राहुल गांधी यांनी पक्षातील इतर सदस्यांसोबत ‘तानाशाही नही चलेगी... वी वॉन्ट जस्टीस, प्रधानमंत्री जवाब दो’ असे नारेही लगावले. यावेळी, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. सदनात या गोंधळादरम्यान राहुल अनेकदा सोनिया गांधी यांच्याशी बोलतानाही दिसले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.