उत्तराखंड: सरस्वती नदीवरील पूल बुडाला, 164 भाविक फसले

उत्तराखंडच्या चार धाम यात्रेवर पुन्हा एकदा संकट येण्याची शक्यता आहे. तिथं गेलेल्या १६४ भाविकांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं सरस्वती नदीवरील पूल अचानक वाहून गेलाय. 

Updated: Jul 16, 2014, 05:11 PM IST
उत्तराखंड: सरस्वती नदीवरील पूल बुडाला, 164 भाविक फसले title=

डेहरादून: उत्तराखंडच्या चार धाम यात्रेवर पुन्हा एकदा संकट येण्याची शक्यता आहे. तिथं गेलेल्या १६४ भाविकांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं सरस्वती नदीवरील पूल अचानक वाहून गेलाय. 

ही घटना जेव्हा घडली तेव्हा भाविक केदारनाथहून दर्शन घेवून परतत होते. आता पूल वाहून गेल्यानं नीलटोलीमध्ये १६४ भाविक फसले आहेत. त्यांना परतायचा आता कोणताही रस्ता सध्या दिसत नाहीय. 
यादरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळं चार धाम यात्रा थांबविण्यात आलीय. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची यात्रा प्रशासनानं थांबवलीय. उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची चेतावनी देण्यात आलीय.  

मंगळवार रात्रीपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतेय. केदारनाथच्या वाटेवर मंदाकिनी नदीची पाणीपातळी खूप वाढलीय. काही भागांमध्ये नागरिकांनी आपली घरं रिकामी केली आहेत. पावसामुळं अनेक जागांवर नागरीक फसलेले आहेत. अनेक स्थानांवर भूस्‍खलन आणि मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणांवर भाविक फसलेले आहेत. बाबा रामदेव सुद्धा गंगोत्रीमध्ये फसलेले आहेत. 

मागील वर्षी चार धाम यात्रेदरम्यान हजारो भाविकांचा पुरात अडकल्यानं मृत्यू झाला होता. यामुळं यंदा प्रशासनानं भाविकांना हवामानासंदर्भात सतर्क राहण्यास सांगितलंय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागनं हवामान खात्याच्या चेतावनीनुसार हिमालय क्षेत्रातील केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री इत्यादी तीर्थस्थानांवर जाणाऱ्या भाविकांना तयार राहण्यास सांगितलंय आणि त्यांच्यापर्यंत परिसरातल्या परिस्थितीची प्रत्येक माहिती पोहोचवण्यात येतेय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.