खाप पंचायतीचा तालिबानी फतवा, 'दलित मुलीवर रेप करा'

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात खाप पंचायतीने दलित मुलीसोबत रेप करण्याचं फर्मान सोडलंय. पीडित मुलीच्या भावाने दुस-या जातीच्या मुलीला घेऊन फरार झाला होता. त्यामुळे खाप पंचायतीने हा तालिबानी फतवा सोडला. या प्रकरणी मुलीने सुप्रीम कोर्टात याचिका करून संरक्षणाची मागणी केलीय.  

PTI | Updated: Aug 20, 2015, 09:36 AM IST
खाप पंचायतीचा तालिबानी फतवा, 'दलित मुलीवर रेप करा' title=

बागपत : उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात खाप पंचायतीने दलित मुलीसोबत रेप करण्याचं फर्मान सोडलंय. पीडित मुलीच्या भावाने दुस-या जातीच्या मुलीला घेऊन फरार झाला होता. त्यामुळे खाप पंचायतीने हा तालिबानी फतवा सोडला. या प्रकरणी मुलीने सुप्रीम कोर्टात याचिका करून संरक्षणाची मागणी केलीय.    

३० जुलै रोजी खाप पंचायतच्या बैठकीत सांगितले की, पीडित मुलीच्या भावाने एका विवाहीतेला पळवून मोठा अपरात केला आहे. त्यामुळे मुलीला तशीच शिक्षा मिळाली पाहिजे. त्यामुळे एका दलित मुलीवर रेप करुन तिची गावातून नग्न धिंड काढण्याचा अजब तालिबानी फतवा काढला आहे.

पीडित मुलीने न्यायालयात याचिका दाखल केली. माझ्या भावाचे दुसऱ्या समुदायातील मुलीशी तीन वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. तिचे लग्न तिच्या मर्जीच्याविरोधात दुसऱ्या मुलाशी लावून दिले गेले, असे तिने या याचिकेत म्हटलेय.

लग्नानंतर एक महिन्यानंतर मुलगी सासर सोडून  बावाबरोबर पळून गेली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघे पोलिसांना शरण गेलेत. दरम्यान, पोलिसांनी मुलाला नकली ड्रग्स केसप्रकरणी अटक करून जेलमध्ये पाठविले.

३० जुलैला जाट समुदायाच्यावतीने एक खाप पंचायत बोलविण्यात आली. या बैठकीत भावाची शिक्षा म्हणून पीडित मुलीवर रेप करण्याचे फर्मान सोडण्यात आले. यावढ्यावर न थांबता तिची गावातून नग्न धिंड काढण्यात यावी, असे सांगितले. ही माहिती पीडित मुलीच्या वकिलांनी दिली. याबाबत पीडित मुलीने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आणि संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.