नवी दिल्ली : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर (इमिग्रेशन) अर्जावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रच काँग्रेसने सादर केले. त्यानंतर वाद अधिक वाढला आहे. मी मोदींच्या अर्जावर सही केल्याची कबुली दिली, ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी २०११मध्ये इग्लंडमधील कोर्टात साक्ष नोंदविली. त्यात आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची पाठराखण केल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसने बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत वसुंधरा राजेंविरोधात सहीचा पुरावा सादर केला होता. त्यातून असं स्पष्ट होतं की, राजेंनी ललित मोदींच्या स्थलांतर अर्जाला संमती दर्शवली होती. तसेच ही माहिती गुप्त ठेवली जाईल आणि मी दिलेली मदत ही संबंधीत भारतीय अधिकाऱ्यांना पुरवली जाणार नाही, या अटीवरच मी ही साक्ष देत असल्याचा उल्लेखही यात केलाय. दरम्यान, मी त्यावेळी मुख्यमंत्री नव्हते, असेही स्पष्टीकर राजे यांनी दिलेय.
दरम्यान, काँग्रेसचे सचिन पायलट यांनी राजेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर भाजपने त्यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचवेळी भाजपनेही त्यांची पाठराखण केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी यावर म्हटले, हे काँग्रेसचे सरकार नाही. हे एनडीचे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.