नवी दिल्ली : शिक्षक दिनाच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) संपूर्ण भारतातील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
खास विद्यार्थ्यांसाठी यावेळी ते एक भाषणही करणार आहेत. याच भाषणाचं ‘लाईव्ह’ प्रक्षेपण होणार आहे. टीव्हीवर तर हे भाषण दिसणारच आहे परंतु, इंटरनेटवरही या भाषणाचे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ दाखवलं जाईल. इंटरनेटसहीत दूरदर्शन, पंतप्रधान कार्यालय आणि मनुष्यबळ मंत्रालयाच्या वेब चॅनल्सवर हे भाषण लाईव्ह दिसू शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे भाषण दुपारी 3 वाजता सुरु होणार असून ते सायंकाळी 4.45 वाजेपर्यंत सुरू राहील.
खालील लिंकवर तुम्ही मोदींचं हे भाषण पाहू शकता...
www.youtube.com/user/DDNewsofficial
www.youtube.com/user/HRDMinistry
www.youtube.com/user/DoordarshanNational
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.