दिव्यांग प्रांजल पाटीलला मिळाला न्याय

यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या अंध प्रांजल पाटीलला पोस्टिंग मिळूनही रेल्वे मंत्रालयानं नियुक्ती न दिल्याच्या झी 24 तासच्या वृत्ताची अखेर रेल्वेमंत्र्यांनी दखल घेतलीय. 

Updated: Jan 4, 2017, 09:43 PM IST
 दिव्यांग प्रांजल पाटीलला मिळाला न्याय  title=

नवी दिल्ली : यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या अंध प्रांजल पाटीलला पोस्टिंग मिळूनही रेल्वे मंत्रालयानं नियुक्ती न दिल्याच्या झी 24 तासच्या वृत्ताची अखेर रेल्वेमंत्र्यांनी दखल घेतलीय. 

प्रांजलला दिलेल्या पोस्टिंगनुसार तातडीनं नियुक्ती देण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. त्यामुळं प्रांजलच्या संघर्षाला अखेर यश आलंय. अंध असूनही प्रांजलनं यूपीएससीच्या परिक्षेत देदिप्यमान यश मिळवलं होतं. त्यानंतर डीओपीटीनं तिला रेल्वे खात्यात पोस्टिंग दिली होती. 

मात्र प्रशिक्षणासाठी गेलेल्या प्रांजलची नियुक्ती रेल्वे खात्यानं रद्द केली होती. वारंवार खेटा घालूनही तिच्या तक्रारीकडे रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केलं होते. 

मात्र झी 24 तासच्या वृत्तानंतर रेल्वेमंत्र्यांनी दखल घेत तिला न्याय दिलाय. काल सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी तिचा संघर्ष जगासमोर आला तर आज ब्रेल लीपी दिनाला तिला न्याय मिळाला...