भ्रष्टाचार विरोधात नवीन हत्यार 'शून्य रुपया नोट्स'

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच याविरोधात एक चांगले हत्यार असावे म्हणून 5th Pillar volunteers संस्थेचे एक नवे पाऊल 'शून्य रुपया नोट्स' असणार आहे.

Updated: Mar 18, 2016, 03:04 PM IST
भ्रष्टाचार विरोधात नवीन हत्यार 'शून्य रुपया नोट्स' title=

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच याविरोधात एक चांगले हत्यार असावे म्हणून 5th Pillar volunteers संस्थेचे एक नवे पाऊल 'शून्य रुपया नोट्स' असणार आहे.

आम आदमीची सरकारी कार्यालयात कामे करुन देताना अनेक वेळा काही अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी होते. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी होण्याचे नाव घेत नाही. तसेच काळा पैशाचा वापर अनेक ठिकाणी होत आहे. त्याला आळा घालण्यात अजुनही अपयश येत आहे. त्यावर उपाय म्हणून ही 'शून्य रुपया नोट्स' असणार आहे.

सर्व सामान्य माणसांकडून कोणी पैशाची मागणी केली तर त्या पैशातून ही नोट्स मिळाली तर भ्रष्टाचार ट्रॅप करणे सोपे जाईल, असा या मागचा हेतू आहे. याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत पावडर लावलेल्या नोटा दिल्या जात होत्या. आता ही 'शून्य रुपया नोट्स' देण्यात येणार आहे, अशी ही नवी योजना आहे.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी या नोटेचे वितरण रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, शाळा, बाजार आदी ठिकाणी या स्वयंसेवक वाटप करणार आहेत. तसेच जनजागृतीसाठी माहिती पुस्तिका आणि पत्रके वाटप करण्यात येत आहे. 

अधिक माहितीसाठी www.5thpillar.org या संकेतस्थळावर लॉगऑन करा.