इंग्रजी लेखक ख्रिस्तोफर यांचे निधन

इंग्लंडमधील प्रसिद्ध इंग्रजी लेखक, समीक्षक, स्तंभलेखक आणि पत्रकार ख्रिस्तोफर हिचन्स (६२) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांनी कॅन्सरशी शेवटपर्यंत लढत दिली.

Updated: Dec 18, 2011, 04:00 PM IST
 झी २४ तास वेब टीम, वॉशिंग्टन
 इंग्लंडमधील प्रसिद्ध इंग्रजी लेखक, समीक्षक, स्तंभलेखक आणि पत्रकार ख्रिस्तोफर हिचन्स (६२)  यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांनी कॅन्सरशी शेवटपर्यंत लढत दिली.

 पोर्टसमाऊथमध्ये १९४९ मध्ये त्यांचा जन्म झाला. १९७० च्या दशकामध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये  पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर १९९२ मध्ये ते व्हॅनिटी फेअरचे संपादकही झाले.

हिचन्स यांना कॅन्सर (कर्करोग) झाल्याचे २०१० च्या जून महिन्यामध्ये निदान झाले. ऑगस्ट २०१०  मध्ये त्यांनी आपल्या स्तंभात आजाराबाबत लिहिले.  त्यांनी आंतरराष्ट्रीय विषयांवर विपूल लेखन  केले आहे.

अमेरिकेचे इराक युद्ध यावर त्यांनी लिखाण केले आहे.  त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी कॅरोल ब्ल्यू, अँतोनिया, अलेक्‍झांडर आणि सोफिया ही मुले आहेत.