इंग्लंड संसदेत भारतीय सीमा मल्होत्रा

इंग्लंडमधील पोटनिवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवार सीमा मल्होत्रा यांनी बाजी मारली.

Updated: Dec 17, 2011, 06:57 AM IST

झी २४ तास वेब टीम, लंडन 

 

इंग्लंडमधील  पोटनिवडणुकीमध्ये  भारतीय वंशाच्या उमेदवार सीमा मल्होत्रा यांनी बाजी मारली.

 

इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या सीमा मल्होत्रा उमेदवार होत्या.  भारतीय वंशाच्या उमेदवार सीमा यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या पोटनिवडणुकीमध्ये सहज विजय मिळवीत पक्षाची जागा कायम राखली.

 

फेल्टहॅम आणि हेस्टन मतदारसंघात झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये मल्होत्रा यांनी मागील निवडणुकीपेक्षा ८.५६  टक्के अधिक मते मिळविली. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये मजूर पक्षाच्या ऍलन कीन यांनी ४६५८च्या मताधिक्‍याने ही जागा जिंकली होती.