आपल्याला हे ऐकून नक्कीच नवल वाटेल की ब्रिटनमध्ये फेकण्यात आलेला सामानाला गुंडाळण्यात येणारा कागद आणि ख्रिसमस कार्ड यांना एकत्र केलं तर त्यातून इतकं बायो इंधनची निर्मिती होईल की त्यावर एक डबल डेकर बसने चंद्राच्या भोवती २० हून अधिक वेळा सफर करता येईल.
लंडनच्या इंपेरिअल कॉलेजने केलेल्या संशोधनातून हे निष्पन्न झालं आहे की रद्दी कागदांपासून उच्च प्रतीचं बायो इंधनची निर्मिती केली जाऊ शकते जे वाहनांमध्ये वापरता येईल.
संशोधकांना ही आशा वाटत आहे की रद्दी कागदापासून निर्मिती केलेलं बायो इँधन डीझल किंवा पेट्रोल एक पर्याय ठरु शकतो. आणि पर्यावरणाची त्यामुळे हानी देखील कमी होईल. एका अंदाजानुसार ब्रिटनमध्ये ख्रिसमसच्या दरम्यान दीड अब्ज कार्ड आणि ८३ स्क्वेअर किलोमीटर अंतरापर्यंत गुंडाळता येईल एवढा कागद फेकण्यात आला आहे.