भारत-पाक क्रिकेट सिरीज सुरू व्हावी - झरदारी

झरदारी यांच्या बरोबरच्या चर्चेत भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. मुंबई हल्ल्यातल्या दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा भारताकडून उपस्थित करण्यात आला. द्विपक्षीय व्यापार वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सिरीज सुरु करण्याची मागणी झरदारींनी पंतप्रधानांकडे केल्याचं सुत्रांनी सांगितलं.

Updated: Apr 9, 2012, 12:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

झरदारी यांच्या बरोबरच्या चर्चेत भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. मुंबई हल्ल्यातल्या दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा भारताकडून उपस्थित करण्यात आला. द्विपक्षीय व्यापार वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सिरीज सुरु करण्याची मागणी झरदारींनी पंतप्रधानांकडे केल्याचं सुत्रांनी सांगितलं.

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी धार्मिक भेट असल्याचं सांगत पंतप्रधान मनमोहन सिंग भेट घेऊन चाळीस मिनिटे चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. झरदारींनी यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकिस्तान भेटीचं आमंत्रण दिलं. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानला भेट देण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी झरदारींबरोबरच्या चर्चेत मुंबई हल्ल्यातल्या सूत्रधारांवर आणि जमात उद दावाचे हाफिज सईदवर कारवाईची स्पष्टपणे मागणी केली. पाकिस्तानकडून कृती झाली तरच द्विपक्षीय संबंध सुधारण्यास मदत होतील असंही भारताकडून बजावण्यात आलं. व्हिसा नियम शिथील करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. तसंच दोन्ही देशांदरम्यान गृहसचिवस्तरीय बैठकही लवकच होणार आहे.

झरदारींची ही खासगी भेट असली तरी द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यावर काय कृती करते यावरच दौ-याचे फलीत अवलंबून असणार आहे.