कराची : पाकिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे कराचीतील 150 वर्षांपूर्वीच्या रत्नेश्वर महादेव मंदिराला धोका निर्माण झाला आहे.
शिवमंदिराशेजारी एक फ्लायओव्हर ब्रिज आणि दोन भूमिगत रस्ते बांधण्यात येत आहेत. त्यासाठी खोदकाम सुरु आहे. पाकिस्तान हिंदू पंचायतचे महासचिव रवी दवानी यांनी सांगितले, फ्लायओव्हर आणि दोन भूमिगत रस्ते बांधण्यात येणार आहेत. या ठिकाणी रत्नेश्वर महादेव मंदिर आहे. खोदकामामुळे मंदिराला तडे गेले आहेत.
या मंदिरात राम, सीता, कालिमाता, सरस्वती आणि लक्ष्मी, गणेश यांच्या मूर्ती आहेत. हे खोदाईचे काम घाईत झाल्याने मंदिर व्यवस्थापनाला हे काम रोखण्यासाठी काहीच कालावधी मिळाला नाही, असे दवानी यांनी सांगितले. तर पाकिस्तान मानावाधिकार आयोगाचे अध्यक्ष जोहरा युसूफ यांनी मुख्य न्यायाधीस यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
दुसऱ्या समुदायातील एकाद्या धार्मिक रितीरीवाज यांचे पालन करण्यासाठी जागा न देणे हा एक प्रकारचा अत्याचार आहे, अशी काहींनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.