बर्न : स्वित्झर्लंडमध्ये जगातला सर्वात मोठा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.
भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 11 वाजून 39 मिनिटांनी या बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना झाली. झ्युरिच आणि लुगाना शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर हा तब्बल 57 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आलाय.
बोगदा बांधण्यासाठी 1 कोटी 80 लाख डॉलर्स खर्च करण्यात आलेत. बोगदा तयार व्हाला तब्बल 17 वर्ष लागली.