बर्लिन : जर्मनीत एक विचित्र घटना घडली आहे, शरीरसंबंधा दरम्यान काकडी अडकल्याने तरूणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ४६ वर्षीय ऑलिवर डिटमॅन याला जेलची हवा खावी लागली आहे, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप लावलण्यात आला आहे.
प्रणयसुख घेताना ऑलिवरने आपल्या गर्लफ्रेन्डच्या तोंडात काकडी कोंबली. सेक्स टॉईज म्हणून ते नेहमी फळभाज्यांचा वापर करत असत, अशी कबुलीही त्याने दिली आहे.
ऑलिवरने आपल्या प्रेयसीच्या तोंडात काकडी कोंबली आणि त्याला किचनमधून धूर येताना दिसला, त्याने कुत्र्यासाठी चिकन शिजवायला ठेवलं होतं, ते चिकन त्याने कुत्र्याला दिलं, मात्र तोपर्यंत प्रेयसीच्या गळ्यात काकडी अडकल्याने, तिचा श्वास थांबला आणि ती कोमात गेली, यानंतर घशातील काकडी काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.