मनिला : फिलिपाईन्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दफन करण्यात आलेल्या तीन वर्षांच्या मुलीला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.
फिलिपाईन्समध्ये चक्क तीन वर्षांच्या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिचे अंतिम संस्कार सुरु होते. तिचे लगेचच दफन करण्यात येणार होते. मात्र, त्याचवेळी तिची मान हलल्याचे एकाच्या लक्षात आले. त्यांने लगेच ही घटना काही व्यक्तींच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुलीच्या हृद्याचे ठोके आणि नाडी पाहाण्यात आली. मुलगी जिवंत असल्याचे लक्षात येतात तिला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात भरती करण्यात आले.
दफन करण्याच्या ठिकाणाहून त्या मुलीला बाहेर काढले. त्याचवेळी तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. याबाबतच्या एक व्हिडिओ प्रत्यक्षदर्शीने युट्युबवर शेअर केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.