नवी दिल्ली : इंडोनेशियामध्ये असे एक गाव आहे जिथे लोक बोलण्याऐवजी इशाऱ्यांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. या गावाला डीफ व्हिलेज यानावानेही ओळखले जाते.
या गावातील अनेक पिढ्या शब्दांनी बोलण्याऐवजी इशाऱ्यातून बोलतात. त्याचबरोबत येथील अनेक कार्यालयांमध्येही केवळ इशाऱ्याद्वारे बातचीत केली जाते. या सांकेतिक भाषेला काटा कोलोक असे म्हणतात. ही शेकडो वर्षे जुनी सांकेतिक भाषा आहे.
या गावात बाहेरुन येणाऱ्या लोकांचे प्रमाणही कमी आहे. बेंगकला असे या गावाचे नाव आहे. या गावांतील अधिकतर नागरिक बोलू अथवा ऐकू शकत नाहीत. जन्मापासून यांच्या मुलांनाही बोलण्या आणि ऐकण्याची समस्या जाणवते. या समस्येसाठी येथील भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे.