महिलेचा वर्ल्ड रेकॉर्ड... १४ पुरूषांपासून जन्म दिला १४ मुलांना

 परदेशात कशाचा रेकॉर्ड करतील याला सीमा नाही किंवा त्यांना संस्कृतीची बंधनेही नाही. अमेरिकेच्या डेट्रॉटमध्ये एका 36 वर्षी महिलेने आपल्या १४ व्या अपत्याला जन्म देऊन एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड बनविला आहे. या अनोख्या रेकॉर्डसाठी १४ वेगवेगळ्या पुरुषांसोबत महिलेने संबंध ठेवले होते. त्यामुळे या रेकॉर्डला विशेष महत्त्व आले आहे.

Updated: Jul 22, 2016, 08:03 PM IST
महिलेचा वर्ल्ड रेकॉर्ड... १४ पुरूषांपासून जन्म दिला १४ मुलांना title=

हार्पर :  परदेशात कशाचा रेकॉर्ड करतील याला सीमा नाही किंवा त्यांना संस्कृतीची बंधनेही नाही. अमेरिकेच्या डेट्रॉटमध्ये एका 36 वर्षी महिलेने आपल्या १४ व्या अपत्याला जन्म देऊन एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड बनविला आहे. या अनोख्या रेकॉर्डसाठी १४ वेगवेगळ्या पुरुषांसोबत महिलेने संबंध ठेवले होते. त्यामुळे या रेकॉर्डला विशेष महत्त्व आले आहे.

 
का केला असा विचित्र रेकॉर्ड  

रेकॉर्ड बनविणार्‍या महिलेचे नाव अनिता सुलिवान असे असून २०१७ या गिनीज बुकच एडिशनमध्ये हे रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे. तिची आई तिला आळशी म्हणून हिणवत होती. त्यामुळे काही वेगळे करायचे ठरवून मी हे पाऊल उचलले. या रेकॉर्डमुळे मला स्वत:ला अभिमान वाटत असल्याचे अनिताने स्पष्ट केले. 

 
१३ मुलं खुश

 १४ व्या अपत्याच्या जन्मानंतर तिची बाकीची 13 मुलेही हार्पर युनिव्हर्सिटीच्या रुग्णालात भेटायला आली होती. ती सर्वजण या विक्रमामुळे आनंदित आहेत. अनिता म्हणाली, मुलांच्या वडिलांना निवडण्यात खूप चूक केली आहे. सगळ्यांनी मला त्रास दिला आहे. मात्र, माझा नवीन पार्टनर रेमॉन मेरे हा चांगला असून, आम्ही अडीच वर्षापासून एकत्रित राहत आहोत. 

अनिताला सोडलेले १३ पार्टनरपैकी ११ जणांकडून पेंशन मिळत आहे. बाकी दोघांच पेंशनसाठी न्यायालयात केस चालू असल्याचे समोर आले आहे.