लंडन: सुप्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते रिचर्ड अँटनबरो यांचं निधन झालंय. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला.
'गांधी' या १९८२ साली आलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून ते भारतीयांच्या विशेष लक्षात राहतील. हा चित्रपट जगभर गाजला. या चित्रपटाच बेन किंग्जले यांची महात्मा गांधींची तर रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तुरबा गांधींची भूमिका केली होती. गांधी या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर मिळाले होते.
त्यांच्या निधनामुळं हॉलिवूडमधल्या एका पर्वाचा अस्त झालाय. अँटनबरो यांनी रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये अभिनयही केला होता. ते एक यशस्वी दिग्दर्शकही होते.
जुरासिक पार्क, द लॉस्ट वर्ल्ड या अलिकडच्या काळातल्या गाजलेल्या चित्रपटातही त्यांची लक्षवेधी भूमिका होती. गांधी हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीचा माईलस्टोन ठरला. गोल्डन ग्लोब, द ग्रेट एस्केप, डॉ. डुलिटील या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या. सत्यजित रेंच्या ‘द चेस प्लेअर्स’मध्येही त्यांनी भूमिका केली होती. अलिकडच्या काळात त्यांची स्विव्हन स्पिलबर्गच्या ज्युरासिक पार्कमधील भूमिका लक्षात राहिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.