www.24taas.com, लंडन
सध्या मायक्रोसॉफ्टच्या विल्यम हेन्री बिल गेटस् जवळजवळ ६५ अरब डॉलरचे मालक आहेत. पण, ही संपत्तीचा वापर केवळ स्वत: पुरता न करता त्यांना इतरांच्या कल्याणासाठी वापरायची इच्छा आहे. वर्तमानपत्र ‘टेलीग्राफ’नं दिलेल्या माहितीनुसार बिल गेटस यांना आता पैसे कमावण्याची इच्छा उरली नाही तर आता त्यांना इच्छा आहे ती सामाजिक कार्यात सहभागी होण्याची...
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक ५७ वर्षीय बिल गेटस् यांनी यापूर्वीच आपली २८ अरब डॉलरची संपत्ती दान केलीय. आता त्यांनी स्वत:ला पोलिओ अभियानासाठी झोकून द्यायचं ठरवलंय. ‘आता माझ्याकडे अन्न आणि वस्त्राची निश्चिती आहे. त्यामुळे एका सीमेनंतर माझ्याकडे असणाऱ्या पैशांचा मला काही एक उपयोग नाही. या पैशांचा एकमात्र उपयोग म्हणजे संस्था निर्माण करणं आणि त्यांना जगातील सर्वात अधिक वंचित व्यक्तींपर्यंत ते पोहचवणं…’
गेटस् यांच्याजवळ वॉशिंग्टनमध्ये सरोवराच्या काठी उभारलेला १५ करोड डॉलर्सचा बंगला आहे. या बंगल्याच्या परिसरातच भव्य असा स्वीमिंग पूल बांधण्यात आलाय... ज्यामध्ये पाण्याच्या आत म्युझिक सिस्टम लावण्यात आलाय. परंतू, वयाच्या ५७ व्या वर्षात गेटस् यांना हे पैसे सूख आणि समाधान देऊ शकत नाहीत. त्यांना करायचंय काहीतरी नवं...
गेटस् आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी आपल्या संस्थेमध्ये २८ अरब डॉलरचं दान केलंय. यामधील आठ अरब डॉलर आंतरराष्ट्रीय स्वास्थ्यासंबंधी कार्यासाठी दिले गेलेत. गेटस् यांच्या म्हणण्यानुसार, पोलिओ हा विशेष रोग आहे कारण जर तो तुम्हाला समूळ नष्ट केलात तर त्यावर जास्त पैसे खर्च करण्याची गरज उरत नाही. परंतू हा रोग आजही नायजेरिया, पाकिस्तान आणि अफगानिस्तानात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. १९९० साली याच पोलिओमुळे पाच वर्षांखालील जवळजवळ १.२ करोड लहानग्यांचा बळी गेला होता. आजही हा आकडा ७० लाखांच्या घरात आहे. याचाच अर्थ आजही दररोज १९ हजार बालकं या रोगाला बळी पडतात. ‘बिल अॅन्ड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन’नं येत्या वर्षाच्या काळात पोलिओ निर्मूलनासाठी १.८ अरब डॉलर खर्च करण्याचा निर्णय घेतलाय. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार, या बळींची प्रमुख कारणं होती निमोनिया (१८ टक्के), जन्मापूर्वीच्या समस्या (१४ टक्के), डायरिया (११ टक्के), जन्माच्यावेळी निर्माण झालेल्या समस्या (९ टक्के) आणि मलेरिया (७ टक्के)...