www.24taas.com, झी मीडिया, काठमांडू
आंतरराष्ट्रीय टोळ्यांमुळे भारताची झोपच उडाली आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये १८ आंतरराष्ट्रीय टोळया भारत-नेपाळ सीमेवर सक्रिय असल्याचे म्हटले आहे. लष्कर ए तोएबाचा दहशतवादी अब्दुल टुंडा आणि यासिन भटकळच्या अटकेनंतर याला पुष्टी मिळाली.
भारत-नेपाळ सीमेवर गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याचे नेपाळच्या सुरक्षा संस्थांना माहिती मिळाली आहे. यात दहशतवादी कारवायांचाही समावेश असल्याचे यासिन भटकळच्या अटकेनंतर उघड झाले आहे.
या आंतरराष्ट्रीय टोळया तस्करी, अमली पदार्थाची तस्करी, बेकायदा व्यापार, मानवी व्यापार, दरोडे, अपहरण, खंडणी आदी गुन्हे करीत आहेत. तसे नेपाळच्या गृहमंत्रालय अहवालात म्हटले आहे. दहशतवादी कृत्ये करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय टोळ्या असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.