बगदाद : इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या याझिदी महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या आठवड्यामध्ये काही महिलांची सुटका झाली असून या महिलांनी याबाबतची माहिती दिली.
वायव्य इराकमधील सिंजर या गावामधून शेकडो महिला आणि मुलांचे इसिसने अपहरण केले होते. काही महिलांची विक्री करण्यात आली होती तर काहींना बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. दोनशेहून अधिक महिलांची या आठवड्यात सुटका करण्यात आली आहे.
याझिदी महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार करण्यात येत होते. अनेक महिलांना संभोग करण्यासाठी सैनिकांना विकण्यात आले होते. एका वेळी महिलेवर तीन-चार जण खुलेआम बलात्कार करत होते. शिवाय, महिलांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात येत होती, असे सुटका झालेल्या माहिलांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.