खनके, इराक : इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा क्रुरचेहरा जगासमोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका मुलीची विक्री करावयाची आहे. कुमारिका, सुंदर. वयवर्षे १२. तिची किंमत आता साडेबारा हजार डॉलर्स इतकी झाली आहे. तिची विक्री लवकरच होईल.' अशी जाहिरात करण्यात येत आहे.
ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इसिसला सध्या पराभवांचा सामना करावा लागत आहे. असे असली तरी या संघटनेच्या ताब्यात अजून जवळपास ३ हजार महिला आणि लहान मुली आहेत. त्यांची अशा प्रकारे विक्री केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हॉट्स अप आणि इतर माध्यमांमधून त्यांनी ऑनलाईन बोली लावलेय.
शस्त्रे आणि इतर उत्पादनांच्या जाहिरातींच्या जोडीने अशी 'सेक्स स्लेव्हज'ची जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. इसिसकडून सध्या पश्चिम आशियामधील याझिदी समुदायाच्या महिला आणि लहान मुलांची विक्री केली जात आहे. उत्तर इराकमध्ये इसिसने ऑगस्ट २०१४ मध्ये चढविलेल्या हल्ल्यात हजारो याझिदी महिला आणि लहान मुलांना कैद करण्यात आले होते.