शेनचेन (चीन) : चीनच्या शेनझेन शहरातील औद्योगित परिसरात झालेल्या भूस्सखलनामुळे तब्बल ३३ इमारती जमीन दोस्त झाल्यात. यात तब्बल ३२ महिलांसह ९१ जण बेपत्ता झालेत. बातमीच्या खाली व्हिडीओ पाहा
हे भूस्सखलन आतापर्यंतचे जगातील सर्वात मोठ्या भूस्सखलनापैकी एक मानले जाते. दरम्यान, घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार या भूस्सखलनात ९१ लोक बेपत्ता झालेत. यात ५९ पुरुष आणि ३२ महिलांचा समावेश आहे.
भूस्सखलनामुळे या भागातील तब्बल ३३ इमारती काही क्षणार्धात कोसळल्या. यामुळे औद्योगिक पार्क स्थित गॅस स्टेशनातही विस्फोट झालाय. १५०० जणांचे बचावपथ दुर्घटनास्थळी दाखल झालंय. ढिगाऱ्याखालून अनेकांचे मृतदेह काढण्याचे काम सुरु आहे.