पाकला आणखी एक झटका, मालदीवची सार्क परिषदेमधून माघार

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला एकाकी पाडण्याची भारताची रणनीती सफल होतान दिसतेय. श्रीलंकेनंतर आता मालदीवनेही सार्क परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Oct 1, 2016, 05:29 PM IST
पाकला आणखी एक झटका, मालदीवची सार्क परिषदेमधून माघार title=

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला एकाकी पाडण्याची भारताची रणनीती सफल होतान दिसतेय. श्रीलंकेनंतर आता मालदीवनेही सार्क परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.

दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर सार्क परिषदेत बहिष्कार टाकण्याची घोषणा भारताने केली होती. त्यानंतर बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांनी सार्क परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

मालदीव सरकारने याप्रकरणी जारी केलेल्या निवेदनात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेतून माघार घेतल्याचे स्पष्ट केलेय. आता भारतासह ६ देशांनी सार्क परिषदेवर बहिष्कार टाकलाय. दरम्यान, पाकिस्तानने सार्क परिषदेला तात्पुरती स्थगिती दिलीये. लवकरच संमेलनाच्या नव्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.