भारतीयांची निराशा: मानसीला मुकुट पटकावण्यात अपयश!

चंद्रपूरची मराठमोळी कन्या मानसी मोघे `मिस युनिव्हर्स` स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती. मात्र मुकुट पटकावण्यात तिला अपयश आल्यानं भारतीयांची निराशा झाली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 10, 2013, 07:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मॉस्को
मिस व्हेनेझुएला गॅब्रिएला इसलर यंदाची मिस युनिव्हर्स ठरली. गॅब्रिएलाने जगभरातल्या ८५ सौंदर्यंवतींना मागे टाकत हा मुकुट पटकावला. या स्पर्धेकडे तमाम भारतीयांचंही लक्ष होतं. कारण चंद्रपूरची मराठमोळी कन्या मानसी मोघे या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती. मात्र मुकुट पटकावण्यात तिला अपयश आल्यानं भारतीयांची निराशा झाली.
पराभूत होऊनही मानसीनं साऱ्यांची मनं जिंकली आहेत. ८६ सौंदर्यंवतींमधून टॉप टेनपर्यंत मानसीनं मजल मारली होती. मात्र अंतिम ५ मध्ये स्थान मिळवण्यात ती अपयशी ठरली. रशियाची राजधानी मॉस्को इथल्या क्रॉकस सिटी हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली.
मानसीचे आई-वडील दोघेही ‘वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड’ या सरकारी खाण कंपनीत वैद्यकीय अधिकारी रुपात कार्यरत आहेत. गेले काही वर्षे चंद्रपूर ‘डब्ल्यूसीएल’ क्षेत्रीय रुग्णालयात दोघेही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. सौंदर्यवती मानसी या दाम्पत्याची ज्येष्ठ कन्या. आपली कनिष्ठ कन्या जागृतीसह हा परिवार मानसीच्या मिस युनिवर्स स्पर्धेतील यशाकडे डोळे लावून बसला होता. मात्र मानसीच्या अपयशाने निराश झआलो नसल्याची प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.