www.24taas.com, ह्यूस्टन
अंतराळात १०० दिवस पूर्ण करणाऱ्या भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स आपल्या अनुभवांचा भरभरून आनंद घेत आहेत आणि सुनिताने या अनुभवांना ‘अनमोल ठेवा’ असल्याचं म्हटलयं.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या ३३व्या अभियानाची कमान सांभाळत असलेल्या ४७ वर्षीय सुनिताने म्हटलयं की, मला येथे राहण्यास खूप आवडते आणि मी हवेत तरंगत असताना मला खूप छान वाटते.
सुनिता सध्या रूसच्या फ्लाईट इंजिनिअर यूरी मलॅनचेकनॉ आणि जपानच्या अकिहिओ ऑशिन्दे सोबत अंतराळात राहत आहे. ‘मला वाटतयं आता माझी मानसिकता जशी आहे, तशी कायम राहणार नाही, यासाठी मला जास्त वेळ हवेत तरंगण्याचा फायदा घ्यायचा आहे. अंतराळ स्थानकाहून नासा टीव्हीला सुनिताने मुलाखत दिली. त्यावेळी ती बोलत होती. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतेय आणि हे सर्व क्षण माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत, असेही तिने यावेळी सांगितले.
या ठिकाणी काहीही घरासारखं नाहीय. कुठलीही जागा आपल्या घरासारखी असू शकत नाही, अंतराळ सुध्दा नाही, असंही तिने यावेळी स्पष्ट केलं.