रियाध : सौदी अरेबियातील पोलिसांनी का भिकाऱ्याला अटक केलीय... अटकेनंतर हा भिकारी करोडपती असल्याचं समोर आलंय.
सौदी गॅझेटनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पश्चिम सौदी अरबमधील ‘यान्बू’मधून मूळ अरब असलेल्या या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्याकडे 1.92 करोड रुपये आणि काही किंमती वस्तू जप्त केल्यात.
मदीना पोलिसांचा प्रवक्त फहद अल-गानम यांच्या म्हणण्यानुसार, संदिग्ध अवस्थेत भीक मागताना आढळलेल्या या व्यक्तीला अटक केली गेली. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सौदी अरेबियात भीक मागण्यावर बंदी आहे.
संशयास्पद अवस्थेत आढळलेला हा भिकारी एका लग्झरी अपार्टमेंटमध्ये राहत होता आणि दुसऱ्या शहरांमध्ये जाण्यासाठी स्वत:च्या गाड्यांचाही तो वापर करत होता. चौकशी केल्यानंतर त्याला भीक मागण्यासाठी त्याची पत्नी आणि तीन मुलंही मदत करत असल्याचं समोर आलं. या कुटुंबातील सर्वच सदस्य सौदी अरेबियात अवैधरित्या राहत होते.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आखाती देशांतून ‘इन्व्हेस्टमेंट लायसन्स’ या भिकाऱ्यानं मिळवलं होतं. याच दरम्यान, पोलिसांनी त्याच्या सगळ्या हालचालींची चौकशी केली असता, तो सौदी अरेबियाचा नागरिक नसल्याचंही समोर आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.