आईनं मुलाला धडा शिकवण्यासाठी घेतली 'ट्विटर'ची मदत!

सोशल मीडियावर सध्या एक पत्र चांगलंच वायरल होताना दिसतंय. ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेनं आपल्या मुलासाठी लिहिलेलं पत्र फेसबुकवर चांगलंच गाजतंय. 

Updated: Sep 19, 2015, 09:56 PM IST
आईनं मुलाला धडा शिकवण्यासाठी घेतली 'ट्विटर'ची मदत! title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक पत्र चांगलंच वायरल होताना दिसतंय. ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेनं आपल्या मुलासाठी लिहिलेलं पत्र फेसबुकवर चांगलंच गाजतंय. 

आपला १३ वर्षांचा मुलगा एरॉन याच्यासाठी त्याच्या आईनं - हेडी जॉनसॉन हे पत्र लिहिलंय.  आपल्यासोबत रुममेटसारखं वागू नकोस अशी समजही यातून आईनं आपल्या मुलाला चांगल्याच पद्धतीनं दिलीय.   

 

काय म्हटलंय या पत्रात...
एरॉन आता तू १३ वर्षांचा झालास... आणि मी तुझी पालक आहे. मला असं वाटतंय की जेव्हा तू एकटा राहशील तेव्हा तुला थोडी समज मिळेल. जसं तू मला माझ्या तोंडावर सांगतोयस की तू आता पैसे कमावण्याची सुरुवात केलीस... आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी खरेद केल्या त्या सगळ्या गोष्टी आता तू स्वत:साठी खरेदी करू शकशील. तुला वीज, इंटरनेट आणि जेवण या घरात घ्यायचं असेल तर यासाठी तुला पैसे खर्च करावे लागतील. सोबतच तुला सोमावार, बुधवार आणि शुक्रवारी कचऱ्याच्या डब्यात कचराही फेकावा लागेल. 

तुला स्वत:साठी जेवणंही बनवावं लागेल आणि तुझं टॉयलेट, बाथरुमही तुला स्वत:ला साफ करावं लागेल. जर तू हे करण्यात असक्षम ठरलास तर एखाद्या नोकरासा जो पगार दिला जातो तो मी तुझ्याकडून घेईल... कारण ही तुझी काम मला करावी लागतात. आता निर्णयट तुला घ्यायचाय की तुला माझ्या मुलाप्रमाणे या घरात राहायचंय की एखाद्या रुममेटप्रमाणे... 

आपल्या मुलाला धडा शिकवण्यासाठी या आईनं सोशल वेबसाईट फेसबुकची मदत घेतलीय. तिनं हे पत्र फेसबुकवर शेअर केलंय. ही पोस्ट आत्तापर्यंत ८७,००० लोकांनी लाईक केलीय तर १,६२,००० वेळा ही पोस्ट शेअर करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.