कंडोम चोरणाऱ्या मुलीची पित्याने गळा दाबून केली हत्या

एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या १९ वर्षीय मुलीचा गळा दाबून हत्या केली. तरूणी आपल्या पुरूष मित्रासोबत सेक्स करण्यासाठी एका दुकानातून कंडोम चोरताना पकडली गेली, या कारणावरून पित्याने रागाच्या भरात मुलीचा खून केला. पोलिसांनी तरूणीच्या माता-पित्याला अटक केली आहे. 

Updated: Sep 29, 2015, 11:27 AM IST
कंडोम चोरणाऱ्या मुलीची पित्याने गळा दाबून केली हत्या title=

बर्लिन : एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या १९ वर्षीय मुलीचा गळा दाबून हत्या केली. तरूणी आपल्या पुरूष मित्रासोबत सेक्स करण्यासाठी एका दुकानातून कंडोम चोरताना पकडली गेली, या कारणावरून पित्याने रागाच्या भरात मुलीचा खून केला. पोलिसांनी तरूणीच्या माता-पित्याला अटक केली आहे. 

'डेली मेल' ने दिलेल्या बातमीनुसार असादुल्लाह खान (५१) याने पोलिसांच्या चौकशीत आपल्या मुलीची हत्या केल्याचे कबूल केले आहे. मुलगी लारीबची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खान आणि त्यांची पत्नी शाजिया (४१) यांनी दर्मस्टाद येथील सुमुद्र किनारी गेले होते, असे बातमीत म्हटले आहे. 

चौकशी केल्यानंतर खान यांनी सांगितले की, त्याच्या मुलीने कुटुंबाचा अपमान केला आहे. लारीबचे ज्या मुलावर प्रेम होते, जो मला आवडत नव्हता. खान यांचे लग्न अरेंज मॅरेज होते तसे आपल्या मुलीचेही व्हावे असे खान यांना वाटत होते. 

खान आणि त्याची पत्नी मूळचे पाकिस्तानी आहेत. दोघांविरोधात कोर्टात केस सुरू आहे. शाजियाने सांगितले की मी कमकुवत स्त्री आहे, माझ्यावर पतिचे नियंत्रण आहे. लारीब अनेक रात्री गायब असायची तिने हिजाब घालणे सोडले होते. एकेदिवशी आम्हांला पोलिसांचे पत्र मिळाले की तुमची मुलगी कंडोम चोरताना पकडली गेली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.