वॉशिंटन : अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था 'नासा' ला सूर्याच्या पृष्ठभागावर राक्षसी आकाराचे छिद्र दिसले आहे. हे छिद्र १७ ते १९ मे या दरम्यान आढळून आले आहे. नासाच्या सोलर डायनॅमिक ऑब्जव्र्हेटरीला हे छिद्र व्हिडीओमध्ये कैद करता आले आहे.
सूर्याच्या पृष्ठभागावरील काही भागात उष्णता निर्माण करण्यासाठी सूर्यातील घटक कमी असल्याने अशा ठिकाणी उष्णता कमी असते. ह्या घटकांना 'सोलर मटेरियल' म्हणतात. हा भाग सूर्याच्या इतर भागांपेक्षा काळा दिसतो. या काळ्या दिसण्याऱ्या भागाला 'कोरोनल व्होल' असे शास्त्रीय भाषेत म्हंटले जाते.
नासाला आढळलेल्या या 'कोरोनल व्होल' चा आकार फार मोठा आहे. मात्र यात काळजी करण्यासारखे काहीच नाही असे नासाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. असे व्होल का निर्माण होतात याची काहीच माहिती उपलब्ध नाहीये. पृथ्वीच्या भवती पर्यावरण कसे असते हे समजण्यासाठी याचा अभ्यास आवश्यक आहे, असे नासाने म्हटले आहे. अशा भागांत सौर वादळांची तीव्रता अधिक असते.