काठमांडू : भूकंपाने संपूर्ण नेपाळ कोलमडून पडला आहे. या विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून नेपाळक़डे मतदीचा ओघ सुरु झाला. गेल्या ९ दिवसांपासून ३४ देशांच्या टीम्स आणि तब्बल १२९ स्निफर डॉग्ज येथे कार्यरत आहेत. मात्र आता या सगळ्या टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलावून घ्यावे, असं आवाहन नेपाळ सरकारनं केलंय.
२५ एप्रिलला भूकंपाने जोरदार तडाखा दिला. नेपाळची अर्थव्यवस्थाच कोलमडली. दरम्यान, मीडियाने लाईव्ह चित्रण दाखविल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथून गो बॅक असा नारा देण्यात आला आहे. ट्विटरवरुन तरुणांनी एक मोहीम सुरु केली आहे. गो बॅक, असा नारा देण्यात आलाआहे. दरम्यान, शिल्लक राहिलेले ढिगारे उपसण्याचे काम नेपाळी यंत्रणा आता करू शकेल, असे नेपाळने स्पष्ट केले आहे.
भूकंपानंतर अवघ्या तीन तासांत नेपाळमध्ये सक्रिय झालेलं भारतीय पथक एनडीआरएफ देखील भारतात परतणार आहे. मात्र पुनर्वसनाच्या कामी जगानं शक्यती सर्व मदत करावी असं आवाहन नेपाळ सरकारनं केलंय. त्यामुळे एनडीआरएफ जरी माघारी येत असली तरी भारतीय सैन्याची अभियांत्रिकी टीम नेपाळमध्ये जाणार आहे. या टीमच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसनाचे ठोस काम हाती घेण्यात येतील..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.