बंगळुरु : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासाठी लवकरच एक स्पेशल हेलिकॉप्टरवर स्वार होणार आहेत. या हेलिकॉप्टरचं वैशिष्ट्यं म्हणजे, याचं केबिन 'मेड इन इंडिया' असणार आहे.
अमेरिकन हेलिकॉप्टर निर्माती कंपनी 'सिकोरस्की'नं २००९ साली 'टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम'सोबत एक करार केलाय. यानुसार, एस-९२ हेलिकॉप्टर्ससाठी केबिन तयार करण्याची जबाबदारी टाटा अॅडव्हान्स सिस्टमनं स्वीकारलीय. या हेलिकॉप्टरचा वापर बराक ओबामा यांच्यासहीत इतर महत्त्वाचे व्यक्तीही करणार आहेत.
'सिकोरस्की'च्या सैन्यप्रणालीचे प्रमुख समीर मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या करारानुसार लवकरच १०० वं केबिन अमेरिकेत पाठवण्यात येणार आहे.
एस-९२ साठी सर्व केबिन हैदराबादमध्ये निर्माण होत आहेत. अर्थातच, ओबामा यांच्याही हेलिकॉप्टरचं केबिन हैदराबादमध्येच तयार होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.