बीजिंग : गेली ३५ वर्ष लागू असलेलं एक अपत्य धोरण रद्द करण्याच्या निर्णयावर चीनच्या संसदेनं अखेर शिक्कामोर्तब केलं.
एक अपत्य धोरणामुळं चीनमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढली असून आता तरुणांची संख्या कमी झालीय. त्यामुळंच सरकारनं हे धोरण बदलण्याचा निर्णय घेतलाय. पुढील वर्षी एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होईल.
सरकारच्या या निर्णयामुळे चीनमध्ये आता जोडप्यांना दुसऱ्या मुलाल जन्म देता येणार आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या १५९ स्टँडिंग कमिटीने या कायद्यावर शिक्कामोर्तब केलेय.