व्हिडिओ: चिमुरड्याचा निष्प्राण देह पाहून अंगावर काटा उभा राहिल

तुर्कीतील प्रसिद्ध अशा अंकारा बीचवर एक आपलं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. सध्या सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा सुरू आहे. सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येतंय. 

Updated: Sep 3, 2015, 12:57 PM IST
व्हिडिओ: चिमुरड्याचा निष्प्राण देह पाहून अंगावर काटा उभा राहिल title=

अंकारा, तुर्की: तुर्कीतील प्रसिद्ध अशा अंकारा बीचवर एक आपलं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. सध्या सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा सुरू आहे. सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येतंय. 

आणखी वाचा - व्हिडिओ: हा चिमुरडा साहित्याचा मोठा फॅन...

हा फोटो पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. बीचवर तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह पडलेला आहे. हा मुलगा सीरियातील आहे. सध्या सीरियामध्ये नागरिकांचं स्थलांतरीत होण्याचं प्रमाण वाढलंय. युरोपमध्ये हे शरणार्थी समुद्रामार्गे जात आहेत. 

 

असाच हा चिमुरडा मोठा भाऊ, आई-वडिलांसोबत बोटनं जात होता. ग्रीकच्या कोस आयलंडवर हे लोक जात होते. दोन बोटींमध्ये एकूण 23 सीरियाचे शरणार्थी होते. बोड्रम पेनिनसुलाच्या अकमारलरमधूल बोट रवाना झाली, मात्र ती समुद्रात बुडाली आणि त्यात पाच मुलं आणि एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आणि लाईफ जॅकेटमुळे दोघांना किनाऱ्यावर पोहोचता आलं. मात्र त्यातील तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेही बीचवर वाहून आला.

बीचवर वाहत आलेल्या या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले. या घटनेनंतर #KiyiyaVuranInsanlik म्हणजेच humanity washed ashore (माणुसकी वाहून गेली)हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंगमध्ये होता. अपघाताच्या काही तासाच निष्प्राण चिमुकल्याचा फोटो हजारो वेळा रिट्वीट झाला.

तुर्की मीडियानं दिलेल्या बातमीनुसार या मुलाचं नाव कुर्दी आहे. त्याचा मोठा भाऊ सुद्धा यात मरण पावलाय. 

आणखी वाचा -  जबरदस्त, पाहा ३ वर्षाच्या मुलाची तायक्वांदो पावर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.