रियाद: सौदी अरबमध्ये दगाबाज नवऱ्याचे चाळे एका व्हिडिओद्वारे एक्सपोज करणाऱ्या महिलेला आता शिक्षा भोगावी लागू शकते. देशातील डिफेमेशन कायद्याअंतर्गत पत्नीला शिक्षा होऊ शकते. सौदी अरबच्या एका महिलेनं मेडसोबत फ्लर्ट करणाऱ्या आपल्या नवऱ्याचा व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड केला होता.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी सौदी अरबमध्ये एका महिलेनं आपल्याला नवऱ्याला मेडसोबत फ्लर्ट करतांना पकडलं होतं. तिनं त्यांचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढला होता. या व्हिडिओमध्ये महिलेचा नवरा स्वयंपाक घरात मेडसोबत बोलतांना आणि तिला किस करतांना दिसतोय. यानंतर महिलेनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओसोबत तिनं कॅप्शन लिहिलं होतं, 'या नवऱ्यासाठी कमीत कमी शिक्षा म्हणजे त्याला एक्स्पोज करणं होय.'
व्हिडिओ झाला वायरल
सदा न्यूजपेपरच्या रिपोर्टनुसार हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आणि अधिकाधिक युजर्स महिलेच्या बाजूनं उभे राहिले. अल यमामा नावाच्या एका ब्लॉगर महिलेनं या निर्णयावर लिहिलं, 'मी तुझ्या या शौर्यासाठी सलाम करते. तू खूप चांगलं पाऊल उचललं, त्याची गरजच होती. हा बदला घेण्याचा बेस्ट उपाय आहे.'
तुरुंगात जावू शकते महिला
सौदीच्या टॉप लॉयर मजीद कारूब यांच्यानुसार, महिलेला या गुन्ह्यासाठी एक वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि तिच्यावर ५ लाख सौदी रियाल (८६ लाख रुपयांचा) दंड भरावा लागू शकतो. कारूब यांनी सांगितलं, आयटी क्राइम अंतर्गत बनलेल्या कायद्यानुसार अशा लोकांसाठी शिक्षा ठरलीय, ज्यांनी मोबाईल कॅमेरा किंवा इतर इक्विपमेंटद्वारे फोटोग्राफी करून कुणाचा अपमान केला असेल.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.