क्वेटा : पाकिस्तानच्या पश्चिमेला असलेले क्वेटा शहर आज सकाळी आत्मघातकी बॉम्बस्फोटांनी हादरले. एका पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या कॅम्पबाहेर हा स्फोट घडवून आणण्यात आला.
पाकिस्तानी तालिबानशी संबंध असलेल्या 'जुनदुल्लाह' या दहशतवादी गटाने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या कॅम्पसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना संरक्षण देणाऱ्या पोलीस वाहनात हा स्फोट घडवून आणला गेला. पोलिओ कॅम्पचा आजचा शेवटचा दिवस होता. पोलिओ निर्मूलन मोहिम म्हणजे पाश्चात्य जगाचा हेरगिरीचा प्रयत्न आहे, असा या गटाचा आरोप आहे.
स्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.