वॉशिंग्टन : अमेरिकेनं इराकमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांवर हवाई हल्ले सुरु केलेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामी यांनी इराकवर हल्ला करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर इस्लमिक दहशतावाद्यांना ‘एरबिल’कडे वाटचाल करण्याअगोदरच रोखण्याच्या प्रयत्नात लेजर नियंत्रित बॉम्ब त्यांच्या तोफांवर धडकावलेत. एरबिलमध्येच अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी थांबलेत.
पेन्टागॉनचे प्रेस सचिव रियर अॅडमिरल जॉन किरबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन एफ ए-18 विमानांनी एरबिलच्या जवळच्या तोफांवर लेजर नियंत्रित बॉम्ब टाकलेत. अमेरिकन मध्य कमान कमांडरनं हल्ला करण्याचा हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला कमांडर इन चीफनं दुजोरा दिला.
प्रेस सचिवांच्या माहितीनुसार, आयएसआयएसच्या (ISIS) दहशतवाद्यांनी इरबिल शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्यास, इराकमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना वाचविण्यासाठी कारवाई करण्यात येईल, असं ओबामांनी याआधीच स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.