VIDEO: वाइनमध्ये जिवंत साप टाकून पितात ड्रिंक

चीनमध्ये एका विषारी सापाला दारूच्या बॉटलमध्ये टाकून मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती एका कोब्रा सापाला तांदूळापासून बनवलेल्या दारूच्या बॉटलमध्ये बंद करतांना दिसतात.

Updated: Aug 19, 2015, 09:13 AM IST
VIDEO: वाइनमध्ये जिवंत साप टाकून पितात ड्रिंक title=

बीजिंग: चीनमध्ये एका विषारी सापाला दारूच्या बॉटलमध्ये टाकून मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती एका कोब्रा सापाला तांदूळापासून बनवलेल्या दारूच्या बॉटलमध्ये बंद करतांना दिसतात.

या दरम्यान साप बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो बाहेर पडू शकत नाही. काही वेळानंतर साप बॉटलमध्येच मरतो.

चीनमध्ये असा जिवंत साप दारूमध्ये टाकून स्नेक वाइन तयार करायची पारंपरिक पद्धत आहे. हे ड्रिंग लोकांना खूप आवडतं. जिवंत साप दारूत टाकण्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४ कोटींपेक्षा जास्त लोकांना पाहिलेला आहे. जगभरात चीन आपल्या अजिब खाण्या-पिण्याच्या सवयीसाठी प्रसिद्ध आहे.

तिथं काही जण कुत्रा, मांजर, मगर सारखे जनावरांचं मासही खातात. सोशल साइटवर या व्हिडिओचा निषेध होतोय. प्राण्यांवर असा अत्याचार करणाऱ्यांना शिक्षेची मागणी केली जातेय. 

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.