लंडन : कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच जामीन मंजूर झालाय. वेस्टमिन्स्टर कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलाय. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी माल्यावर कारवाई करत त्याला अटक केली होती. सकाळी 9.30 च्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) 2016 पासून फरार असलेल्या माल्याला स्कॉटलंड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर लंडनमधील एका कोर्टात त्याला सादर करण्यात आलं.
माल्यावर भारतीय बँकांचं 9000 करोड सहीत एकूण 12,000 करोड रुपयांहून अधिक कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. माल्ल्यानं भारतातल्या १४ बँकांमधून हे कर्ज घेतलं होतं.
एसबीआय- १६५० कोटी रुपये
पंजाब नॅशनल बँक- ८०० कोटी रुपये
आयडीबीआय बँक- ८०० कोटी रुपये
बँक ऑफ इंडिया- ६५० कोटी रुपये
बँक ऑप बडोदा- ५५० कोटी रुपये
यूनायटेड बँक- ४३० कोटी रुपये
सेंट्रल बँक- ४१० कोटी रुपये
यूको बँक- ३२० कोटी रुपये
कॉर्प बँक- ३१० कोटी रुपये
एसबीआय मैसूर- १५० कोटी रुपये
इंडियन ओव्हरसिस बँक- १४० कोटी रुपये
फेडरल बँक- ९० कोटी रुपये
पंजाब अॅण्ड सिंध बँक- ६० कोटी रुपये
अॅक्सिस बँक- ५० कोटी रुपये