www.24taas.com, नवी दिल्ली
अल-कायदाचा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकमध्ये ठार केल्यानंतरही त्याला चर्चेतून जीवंत ठेवण्याचे प्रकार जगभरात केले जात आहे. असा प्रकार उत्तर प्रदेशात नुकताच घडला.
उत्तर प्रदेशात शिक्षकपदाच्या नोकरीसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांमध्ये चक्क ओसामा-बिन-लादेन या नावाने अर्ज करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या वडिलांचे नाव बिल क्लिंटन असल्याचे या अर्जदाराने नमूद केले आहे. त्यामुळे हे अर्ज चर्चेचा विषय बनले आहे.
प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांची भरती करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाने अर्ज मागितले आहेत. त्याला प्रतिसाद देताना लादेनच्या नावाचे अनेक बनावट अर्ज शिक्षण विभागाला मिळाले आहेत. त्यातील बरेच पत्तेही चुकीचे आहेत. एका व्यक्तीने आपले नाव ‘फर्जी’ आणि वडिलांचे नाव ‘फर्जीसिंह’ असे दिले आहे. बनावट नावांनी अर्ज भरणार्यां नी आपल्याला शंभर टक्के शालेय गुण मिळाल्याचा दावाही केला आहे.