बीजिंग : सोशल मीडियाचा प्रसार वाढल्यानंतर सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकण्याचा प्रकार घडला आहे.
चीनमधील प्रेमभंग झालेल्या एका युवकाने ब्लॉगवर ‘लिव्ह द वर्ल्ड‘ असा मजकूर अपलोड केल्यानंतर आत्महत्या केली आहे. ही घटना सिचौन प्रांतात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकोणीस वर्षाच्या झेंग याचे त्याच्या प्रेयसीसोबत रविवारी ऑनलाइन भांडण झाले होते. दोघांमधील भांडणानंतर त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
ब्लॉगशिवाय ट्विटर त्याने 'लिव्ह द वर्ल्ड' असा मजकूर अपलोड करून घरामध्ये आत्महत्या केली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
झेंग याने ब्लॉगवर म्हटले आहे की, 'खूप विचार केल्यानंतर जग सोडण्याचा निर्णय घेत आहे. जास्त वेदना होणार नाही, याबद्दल आशा बाळगतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.